Posts

Showing posts from April, 2012

पायरसीची शाळा

साधारण महिन्याभरापूर्वी ही बातमी वर्तमानपत्रात झळकली होती. सुजय डहाके दिग्दर्शित 'शाळा' या मराठी चित्रपटाची पायरेटेड कॉपी युट्युबवर उपलब्ध झाल्याची आणि लगोलग ती कॉपी लिक करणाऱ्या इसमावर कारवाई केल्याचीही. मराठी चित्रपटाचे रूप पालटत आहे. नवे विषय आणि नवे तंत्र यांच्या सहाय्याने त्याने कात टाकली आहे. 'शाळा' चित्रपट हा त्या मराठी चित्रपट सृष्टीतील बदल घडवणाऱ्या चित्रपटांपैकी एक. प्रदर्शनापासून आणि खरेतर त्या पूर्वीपासूनच तो प्रेक्षकांना आकर्षित होता. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की पायरसीची बातमी कळताच दिग्दर्शक सुजय डहाके यांनी पुणे सायबर कॅफेकडे तक्रार नोंदवली. कारवाई नक्की काय केली हे कळले नसले तरी पायरसी रोखण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे हे महत्त्वाचे. पायरसी ही केवळ चित्रपट आणि गाण्यांचीच होते असे नाही. पुस्तकांची, माहितीची, तंत्रज्ञानाची आणि आम्ही ब्लॉगर जे काही लिहितो त्याचीही होते. कुठल्याही प्रकारची चोरी ही वाईटच. त्याचे समर्थन होऊ शकत नाही पण त्यामागे काय कारण आहे ते देखील पाहायला हवे. विशेष म्हणजे चित्रपटांच्या बाबत पायरसीला जितका विरोध आहे तितका गाण्यांच्य